राममंदिर प्रश्नी रविशंकर महाराजांनी लुडबुड करून चुथडा करू नये!- शिवसेना

shivasena vr ravishankar maharaj

मुंबई: रविशंकर महाराजांनी राममंदिराचे इतके मनावर घेऊ नये व या प्रश्नी उगाच घुसखोरी आणि लुडबुड करून चुथडा करू नये. हा प्रश्न त्यांनी मोदी, शहा व मोहन भागवतांवर सोडून जगास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे धडे देण्यास मोकळे राहावे. असे श्री श्री रविशंकर यांना शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून सुनावले.

राममंदिराचा प्रश्न हा न्यायालयात असला तरी दोन्ही पक्षांनी संगनमताने हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत श्री श्री रवी शंकर यांनी व्यक्त केले होते.  राममंदिरच्या संदर्भात नाक खुपसू नका. अयोध्येचा प्रश्न सुटणार नाही सांगण्यासाठी गुरू महाराजांची गरज नाही, असा उल्लेख शिवसेनेने आपल्या मुखपत्रात केला आहे.

अयोध्येत राममंदिर व्हावे म्हणून जो मोठा संघर्ष व रक्तरंजित लढा झाला त्यात हे गुरू महाराज तसे कुठेच दिसले नव्हते. असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे.