‘मंदिर वही बनायेंगे’ -मोहन भागवत

mohan-bhagwat-ram

टीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत समाज जनजागृतीतून भव्यदिव्य असे श्रीराम मंदिर उभारणार असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.राममंदिर होणार ही आपली प्रतिज्ञा आहे. फक्त समाज जनजागृतीतून हे मंदिर बांधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘संतसंगम’ या हिंदू धर्मगुरूंच्या चर्चासत्रात भागवत बोलत होते.पंढरपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धर्म परिषदेस संकेश्वर विद्यापीठाचे शंकराचार्य काडसिद्धेश्वरस्वामी, चैतन्य महाराज देगलुरकर, प्रसाद महाराज अंमळनेरकर, लहवीतकर महाराज, बाळासाहेब देहूकर, राणा महाराज वासकर, किसन महाराज वीर, गहिनीनाथ महाराज औसेकर, मदन महाराज हरिदास उपस्थित होते.

काय म्हणाले भागवत ?

 “धर्माच्या रक्षणासाठी अध्यात्मिक क्षेत्रातील संत-महंत, महाराज मंडळींनी एकत्र येऊन राष्ट्रहित जोपासावे. तसेच गावोगावी जाऊन जातिभेद नष्ट करावा. समाज एकसंघ ठेवण्याची ताकद ही अध्यात्मातच आहे. हजारो वर्षांपासून हिंदू धर्म आपल्या देशात टिकून आहे. हा धर्म यापुढेही टिकून राहण्यासाठी सर्व महाराज मंडळींनी जनजागृती करून जातिभेद नष्ट करावा. सामाजिक समरसता साधण्यासाठी प्रयत्न करावेत.अयोध्येत समाज जनजागृतीतून भव्यदिव्य असे श्रीराम मंदिर उभारणार असून राममंदिर होणार ही आपली प्रतिज्ञा आहे. फक्त समाज जनजागृतीतून हे मंदिर बांधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले”.