fbpx

राममंदिर बाजूला राहिले पण …..जयंत पाटलांची भाजपवर टीका

The Election Commission will take all the coming elections from the ballot paper

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्क्ष जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. राममंदिर बाजूला राहिले परंतू भाजपचे कार्यालय मात्र मोठे झाले, भाजप मतदारांना पैशांचे अमीष दाखवत आहे तसेच भाजपातर्फे संपत्तीचे प्रदर्शनही केले जात आहे. त्यामुळे नोटबंदीमुळे कोणाचे भले झाले हे आता दिसू लागले आहेत असही ते म्हणाले.

भाजप सरकार आणि पंतप्रधान हे जवान आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत त्यामुळे निवडणूक आचारसंहिता भंग केली जात आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे. देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने जोरजोरात भाषणं करुन लोकांशी खोटं बोलतात ते पंतप्रधान पदाला न शोभणारे आहे. आक्रस्ताळेपणा करणारा असा पंतप्रधान कधीच देशाने पाहिला नाही असंही जयंत पाटील म्हणाले.

मंत्र्यांनी शत्रुराष्ट्राचा सॅटेलाईट पाडला असं विधान केलं, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करावं तेवढे थोडं आहे असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकात पाटील यांना लगावला आहे. वंचित बहुजन आघाडीवरही त्यांनी टीका केली, मतं खाण्यासाठी महाराष्ट्रात एक आघाडी तयार केली आहे असा टोला प्रकाश आंबेडकर यांना लगावला.