‘जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू’

टीम महाराष्ट्र देशा – निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी भाजप नेत्यांना आयोध्येतील राम मंदिराची आठवण येवू लागली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू असा दावा केला आहे. मौर्य यांनी केलेल्या या दाव्यामुळे भाजप आगामी निवडणुकीत देखील याच मुद्द्याचा वापर मते मिळविण्यासाठी करणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून गेली दोन दशकांहून अधिक काळ राजकारण करणाऱ्या भाजपला पुन्हा राम आठवू लागला आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत, अशा वेळी या भुमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मौर्यांच्या या वक्त्यव्यावर भाजपच्या बड्या नेत्यांनी अजून तरी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ नंतर आता राज्यात काँग्रेसची ‘जनसंघर्ष’ यात्रा