fbpx

राम मंदिर वादावर कोर्टातून तोडगा अशक्य: श्री श्री रविशंकर

Babri-Ram-mandir-shri shri

टीम महाराष्ट्र देशा- राम जन्मभूमीच्या वादावर न्यायालयातून नव्हे तर परस्पर चर्चेतूनच तोडगा निघेल, अयोध्येत राम मंदिरच होईल. तेथे राम मंदिराच्या निर्मितीसाठी चर्चा सुरू आहे. अयोध्येतच राम मंदिर झाले पाहिजे, असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले आहे.

नेमकं काय म्हणाले श्री श्री ?
न्यायालयातून राम जन्मभूमीच्या वादावर तोडगा निघू शकत नाही. कारण न्यायालयाच्या निर्णयातून एका याचिकाकर्त्याला पराभव स्वीकारावा लागेल. जो पराभूत होईल, ते आता मान्य करतील.नंतर पुन्हा एकदा हा वाद डोके वर काढू शकतो. लवकरच सौहार्दपूर्ण वातावरणात न्यायालयाच्या बाहेर वादावर तोडगा निघण्याची पूर्ण अपेक्षा आहे.