राम शिंदेंच्या अडचणीत वाढ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्षचं राष्ट्रवादीच्या गळाला

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय हालचालींनी चांगलाच वेग घेतला आहे. तर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचा धक्का भाजपचे विद्यमान आमदार आणि पालकमंत्री राम शिंदे यांना बसताना दिसत आहे. राम शिंदे यांना आता निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार असल्याच सांगण्यात येत आहे. कारण राम शिंदे यांचे खंदे समर्थक सुर्यकांत मोरे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तर राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. मोरे हे पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. सुर्यकांत मोरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राम शिंदे यांना धक्का बसणार असल्याच दिसत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार सध्या नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात तळ ठोकून आहेत. या मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही तगडे उमेदवार असल्याने मतदारसंघात दररोज नवी राजकीय समीकरण तयार केली जात आहेत. राम शिंदे हे गेली 10 वर्ष कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच कर्जत जामखेड मतदारसंघ हा भाजपच्या बल्लेकिल्ल्यांपैकी एक आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीला भाजपचा बालेकिल्ला काहीसा धोक्यात आल्याचं दिसत आहे.