विकास कामामुळेचं जनता आपल्या पाठीशी – राम शिंदे

टीम महाराष्ट्र देशा:- मंत्रीपदाचा वापर करून आजवरचा कर्जत-जामखेडचा विकासाचा अनुशेष आपण भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे लवकरच तालुक्यात सहकारी साखर कारखानाही काढणार आहोत सत्ता आपण जनतेसाठी वापरली त्यामुळेच कर्जत -जामखेडची सामान्य जनता आपल्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे, असे विधान जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी केले आहे.

तसेच शिंदे पुढे बोलताना म्हणाले, माझ्याविरोधात कर्जत -जामखेड मधून लढण्यासाठी राष्ट्रवादीला स्थानिक उमेदवार मिळाला नाही म्हणून त्यांना उमेदवार आयात करावा लागला असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.

पुढे ते म्हणाले, कारखाना आणि त्यांच्या शिक्षण संस्थांचे कर्मचारी येथे येऊन राजकीय सर्वे करतात आमच्या मतदारसंघात एकमेव सहकारी कारखाना होता तो अवसायनात काढला तो कुणी विकत घेतला हे सर्वाना माहीत आहे सहकार मोडित काढून हे स्वत:चे कारखाने काढताहेत जनता हे ओळखून आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला टोला लागवला.

आमच्या मतदारसंघातील निवडणुकांचमध्ये कॉपोरेट संस्कुती नव्हती हे आज ज्या पद्धतीने प्रचार दिखाबा करत आहेत ते आमच्यासारख्या सामान्य उमेदवारांना परवडणारे नाही यातून राजीकीय संस्कुतीचा बदलण्याचा धोका आहे त्यामुळे बारामती वरून आलेले हे पार्सल परत पाठवा हे मुख्यमंत्र्याचे विधान योग्य आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, गत पाच वर्षी मी मंत्री म्हणून मतदारसंघात विकासाची अनेक कामे केली मतदारसंघात शासकीय कृषी महाविद्यालय आणले.जलयुक्त शिवाराची कामे केली असे ते असेही शिंदे यांनी विधान केले.

महत्वाच्या बातम्या