राम शिंदेंनी कर्जत मध्ये पलटवला रोहित पवारांचा ‘गेम’, पवारांच्या मनसुब्यांवर फेरल पाणी

टीम महाराष्ट्र देशा : कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड २० मे रोजी पार पडण्याअगोदर एक दिवस आधीच अहमदनगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी भाजपात प्रवेश केलेल्या साधना कदम यांनी निवडीनंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात जात सत्कार स्वीकारुन भाजपाला धक्का दिला होता.

दरम्यान, हा धक्का कर्जत मधून विधानसभा लढवण्याची तयारी करत असलेले शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी राम शिंदेंना दिलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. पण रोहित पवारांचा हा राजकीय गेम कर्जतचे बडे खिलाडी राम शिंदे यांनी पद्धतशीरपणे पलटवून लावला आहे.

आपण भाजपा-शिवसेनेच्या सहकार्यानेच कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले असून आपण भाजपाचेच आहोत. यापुढे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपातच काम करणार आहे, अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य तथा कर्जतच्या नूतन सभापती साधना कदम यांनी पत्रकारांशी बोलताना घेतली आहे. त्यामुळे नवख्या रोहित पवारांच्या बाऊन्सरवर कर्जतचे ओपनिंग बॅट्समन राम शिंदे यांनी थेट सिक्सर मारला आहे.