Share

Ram Shinde | “रोहित पवार यांनी ‘ही’ योजना बंद ठेवण्याचं पाप केलं”, राम शिंदेंचा रोहित पवारांवर आरोप

Ram Shinde | मुंबई : भाजप (BJP) नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी राष्ट्रवादी (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राम शिंदे त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांना फोडत भाजपात सामील करुन घेतलं होतं. यानंतर घुले आणि राम शिंदे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाली असल्याने घुले देखील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच राम शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.

यावेळी, पाणी पुरवठा जामखेड आणि मलनिस्सारण जामखेड, तसेच तुकाई उपसा सिंचन योजना, या योजनेला मार्च 2019 मध्ये सुरुवात झाली होती. 30 टक्के काम पूर्ण देखील झालं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीपासून आजपर्यंत विद्यमान विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ही योजना बंद ठेवण्याचं पाप केलं, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

यादरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्जत-जामखेडच्या प्रश्नावरुन भेट घेतली. काम सांगितल्यानंतर त्यांनी लगेच वेळ उपलब्ध करुन दिली. कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळासह मी आताच त्यांची भेट घेतली. त्यांना दोन कामं सांगितली, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Ram Shinde | मुंबई : भाजप (BJP) नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी राष्ट्रवादी (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now