‘पिसाळलेली भाषा बंद करा, पंढरपूरच्या जनतेने तुमचं तोंड काळ केलं आहे ते पुसून घ्या नीट’

ram satpute vs amol mitkari

पंढरपूर – अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ पंढरीत फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली.

दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजनीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे.

राष्ट्रवादीने अनेक मंत्री त्याठिकाणी प्रचारासाठी उतरवले होते मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसून आला नाही. भाजपने केलेल्या नियोजनबद्ध व्यूहरचनेला राष्ट्रवादीला भेदता आले नाही आणि याचाच परिपाक हा भगीरथ भालके यांच्या पराभवाच्या स्वरुपात पाहायला मिळाला आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत जुगलबंदी रंगली आहे.

राष्ट्रवादीकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले असून मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या या आरोपांना भाजप आमदार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विजय हा विजय असतो कितीही अर्ध नागडे होऊन बोंबलत बसलात तरी उपयोग नाही. प्रचारात भाषा नीट वापरायची असते तरच विजय होतो. प्रचारसभेतली पिसाळलेली भाषा बंद करा. पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने तुमचं तोंड काळ केलं आहे ते पुसून घ्या नीट. पराभव पचवायच शिका असा खोचक सल्ला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या