मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम सातपुते(Ram Satpute) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली असून दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील?, असा सवाल त्यांनी केला आहे.
यासंदर्भात राम सातपुते यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘सरकारचा महसूल वाढवण्यासाठी किराणा दुकानांमधे दारु विकायची गरज नाही. मंत्र्यांनी वसुली आणि हप्तेबाजी कमी केली तरी सरकारचा महसूल वाढू शकतो. पण दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील?’, अशी टीका सातपुते यांनी केली आहे.
सरकारचा महसूल वाढवण्यासाठी किराणा दुकानांमधे दारु विकायची गरज नाही.
मंत्र्यांनी वसुली आणि हप्तेबाजी कमी केली तरी सरकारचा महसूल वाढू शकतो.
पण दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील ?@OfficeofUT@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra #Maharashtra— Ram Satpute (@RamVSatpute) January 27, 2022
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली काल(२७ जाने.) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
“निःस्वार्थ समाजसेवेच्या व्यसनातून डॉ.अवचट यांनी हजारोंना व्यसनमुक्त केले”
“भाजपचा विरोध खोटेपणावर आधारित”, टिपू सुलतान वादावरून नवाब मलिकांनी दिला भारतीय संविधानाचा संदर्भ
योगी सरकारच्या काळात दरोड्यांमध्ये ७० तर चोऱ्यांमध्ये झाली ७२ टक्क्यांची घट- अमित शहा
दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा रणंजी करंडक स्पर्धेचे नियोजन
‘सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारला ‘मद्यराष्ट्र’ करू देणार नाही’; भाजप आक्रमक