पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहिम दोषी

हरीयाणा : पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयानं डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहिमला दोषी ठरवलं आहे. पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला असून या प्रकरणी 17 जानेवारी रोजी रहिमसह चारही दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. या सुनावणीसाठी सुनारिया तुरुंगात असलेल्या राम रहिमला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तुरुंग आणि न्यायालय परिसरात चोख सुरक्षा ठेवण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण ?

2002मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी पहिल्यांदा डेरा सच्चा सौदामध्ये महिला साध्वीवर झालेल्या अत्याचाराविषयी बातमी छापली होती.ऑगस्ट 2017मध्ये न्यायाधीश जगदीप सिंह यांनी याच बलात्काराच्या खटल्यात राम रहीम यांना दोषी ठरवलं होतं. त्यांनीच आजचा निकाल दिला.रामचंद्र छत्रपती हरियाणातल्या सिरसा इथं ‘पूरा सच’ नावाचं सायंकालीन दैनिक चालवायचे.आश्रमातल्या साध्वीसोबत झालेल्या बलात्काराच्या बातमीनंतर ऑक्टोबर 2002मध्ये त्यांची राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली होती.2003मध्ये यासंदर्भातील केस दाखल करण्यात आली होती. तर 2006मध्ये हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आलं.

You might also like
Comments
Loading...