पंजाब, हरियाणातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

ram-rahim-guilty-rajnath-singh-calls-for-high-level-meet

नवी दिल्ली : पंजाब व हरियाणासह अन्य राज्यांत डेरा समर्थकांकडून केल्या जाणा-या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गृह राज्यमंत्री किरण रिजिजू व हंसराज अहिर यांना दिल्लीला बोलावले आहे. उद्या (शनिवार) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिंग यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

रिजिजू आज अरुणाचल प्रदेश, तर अहिर नागपूर दौ-यावर होते. या दोन्ही राज्यमंत्र्यांना तातडीने दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान सिंग यांनी हरियाणा, पंजाब व राजस्थान या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.राम रहिम यांच्या समर्थकांनी शांतता राखावी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहनही सिंग यांनी केले. हिंसाचार व जाळपोळ यातून झालेले मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई केवळ पैशांनी केली जाऊ शकत नाही, असे मत सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.