‘राज्य सरकारने बंदची दिलेली हाक म्हणजे जुलाब शेजाऱ्याला सुरु झाले आणि आपणच शौचालयात जाऊन बसणे’

'राज्य सरकारने बंदची दिलेली हाक म्हणजे जुलाब शेजाऱ्याला सुरु झाले आणि आपणच शौचालयात जाऊन बसणे'

बीड  – लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं काल पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाहायला मिळाला तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या आव्हानाला केराची टोपली दाखवत सर्वकाही सुरु असल्याचं दिसून आले.

या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले होते. मात्र भाजपाने या बंदला विरोध केला होता तसेच सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असं म्हटलं होतं. दरम्यान, या बंद नंतर सत्तादारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे.

भाजप नेते राम कुलकर्णी यांनी महाविकास आघाडीच्या बंद वर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास अघाडी सरकारने बंदची दिलेली हाक म्हणजे जुलाब शेजाऱ्याला सुरु झाले आणि आपणच शोचालयात जाऊन बसणे असा म्हणावा लागेल. मराठवाड्यात शेतकरी अतिवृष्टीने उधवस्त झाला त्याच्या संसारावर नांगर फिरला अभाळ फाटले त्यांना मदतीबाबत काही करायचं नाही . राजकिय द्वेष ठेवून वागायचं आणि काय तर म्हणे बंद ठेवा . आपल्या शेतकऱ्यासाठी काय करणार ते अगोदर सांगा असे आव्हान प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.

महत्वाच्या बातम्या