‘मराठवाड्यात उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याने दुःख सांगावे तरी कुणाला अशी परिस्थिती आहे’

अतिवृष्टी

मुंबई – मराठवाड्यात पावसाने मागच्या पंधरा दिवसात सर्व जिल्ह्यात मिळून 20 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकासह शेतीचा चिखल झाला . खरिपाचे पीक पाण्यात आहे कापूस सोयाबीन मका ऊस मूग उडीद आदी पिके शंभर टक्के हातून गेली . मुके जनवारे मृत पावली तर 25 पेक्षा जास्त लोकांचे जीव गेले . एवढ भयानक संकट असून सुद्धा मायबाप सरकार ढुंकून बघायला तयार नाही? कुठलाही मंत्री शेतकऱ्यांना भेटायला तयार नाही . संसार उध्वस्त झालेले शेतकरी मंत्र्याच्या गळ्यात ओक्साबोक्शी रडू लागले आहेत. दुःखाने पाणावलेले डोळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहणार का? असा सर्वसामान्य जनतेचा सवाल आहे . खरतर प्रशासनाने अद्याप शंभर टक्के पंचनामे पूर्ण केले नाहीत केवळ 20 टक्के पंचनामे झाले आज मुख्यमंत्री शेतकऱ्यांना काय देणार याकडे नजरा लागल्या असल्या तरी किमान हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी होत आहे असे भाजप नेते राम कुलकर्णी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात राम कुलकर्णी म्हणतात, मागच्या पंचवीस वर्षात मराठवाड्यात पावसाने एवढा धुमाकूळ कधीच घातला नव्हता तेवढा धुमाकूळ गत पंधरा दिवसात घातल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले  संसारावर नांगर फिरल्या गत झाली आहे . एकूण पर्जन्यमाना पेक्षा नाही म्हटलं तरी दीड पटीने पाऊस जास्त झाला बीड उस्मानाबाद परभणी जालना हिंगोली नांदेड औरंगाबाद सर्व जिल्ह्यात सरासरी ओलांडली आहे . नुकसानीचे पंचनामे सुरू केले असले तरी प्रशासन धीम्या गतीने काम करत आहे आतापर्यंत केवळ 20 टक्के पंचनामे पूर्ण झाले .

सरकारी आकड्यानुसार 20 लाख हेक्टर शेतीचा चिखल झाला असून वरीलपैकी कुठलेही पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही . खरंतर पडत्या पावसाने नदी नाले तुडुंब भरले एकूण 800 पेक्षा अधिक जनावर वाहून गेली 25 पेक्षा जास्त लोकांचे बळी पाण्यामुळे गेले असून चांगली घरसुद्धा वाहून गेली जनावरांचे गोठे, वस्त्या आकडे सांगता येणार नाहीत एवढे मोठे नुकसान झाल आहे . सामान्य जनता आणि शेतकरी मराठवाड्यात सैरभरआहे सरकार काय देणार? याकडे नजरा लागल्या असल्या तरी ठाकरे सरकारने अद्याप मदतीची घोषणा केलेली नसल्याने  शेतकऱ्यांच्या  मनात तीव्र संताप वाढला .

आठ दिवसापूर्वी राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार जेव्हा दौऱ्यात फिरत होते तेव्हा शेतकरी त्यांच्या गळा पडून ओक्साबोक्शी रडत होते आता दुःख सांगावे तरी कुणाला अशी परिस्थिती आहे . ठाकरे सरकारला संवेदना दिसत नाहीत कारण अशा संकटात तात्काळ मदत जाहीर करणे महत्त्वाचे होते . राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येत आहेत त्यांनी अगोदर किमान पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना तात्काळ देण्याचे आदेश द्यायला हवेत .

वास्तविक पाहता हे सरकार मराठवाड्याच्या प्रश्नावर राजकीय दुराग्रह ठेवत असून मागच्या दोन वर्षात अनेक महत्वाच्या विकास योजना ठाकरे सरकारने रद्द करून टाकले . सरकारमध्ये मराठवाड्यातील सहा मंत्री केवळ सत्तेवर बसलेले नाममात्र दिसतात, एकही मंत्री अजून शेतकऱ्यांच्या भेटीला त्यांचे दुःख पाहण्यासाठी आलेला दिसत नाही तातडीने मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा करायला हवी . शेतकऱ्यांच्या डोळ्यातील दुःख ठाकरे सरकारला दिसत असेल तर मदतीचा हात पुढे करणे काळाची गरज वाटते.

महत्त्वाच्या बातम्या