राज्यात ‘रामलीला’ आयोजनाची परवानगी द्यावी, राम कदमांचं ठाकरेंना पत्र

uddhav thakrey vs ram kadam

मुंबई : राज्यात राज्य सरकारने मंदिर खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले होते. तर, उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

अशातच, आता नवरात्रोत्सव देखील उद्यापासून सुरु होत आहे. मात्र, कोरोनाच अजूनही घोंघावत असलेलं संकट लक्षात घेता प्रशासनाकडून नियम व अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियमावली पाळूनच मर्यादित प्रमाणात सण, उत्सव साजरे करावेत असं आव्हान करण्यात आलं आहे. आता, भाजप आमदार राम कदम यांना एक पत्र लिहिलं आहे.

नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी दसऱ्याला रावणाचे दहन व पारंपरिक रामलीलेच आयोजन करण्यात येत, याच पार्श्वभूमीवर राम कदमांनी यंदाच्या वर्षी देखील वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या परंपरेला परवानगी मिळावी अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या सहा महिन्यात शेकडो वर्षांच्या परंपरा असलेल्या यात्रा, जत्रा खंडित झाल्या आहेत. तसेच सद्याची कोरोनाची स्थिती बघता अशा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देणे अवघड आहे. मात्र, प्रशासन रामलीला आयोजन करण्यास नियम व अटी घालून तरी परवानगी देणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-