आर्यन खानच्या सुटकेसाठी राम कदमांनी केली प्रार्थना, म्हणाले…

आर्यन खानच्या सुटकेसाठी राम कदमांनी केली प्रार्थना, म्हणाले…

मुंबई : क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार असून आजच्या न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो आर्थर रोड जेलमध्ये आहेत. दरम्यान आजच्या सुनावणी वरून भाजपा नेते राम कदम यांनी आर्यनच्या सुटकेसाठी प्राथर्ना केली आहे.

राम कदम यांनी ट्वीट करत म्हंटले की, “प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एक व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही, अखंड मानवजातीची ड्रग्सविरोधी लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्स प्रकरणात ड्रग्स माफियाच्या विरोधात उभे राहतील. मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला,” असं म्हणत राम कदम यांनी यावेळी ठाकरे सरकारवरही टीका केली आहे.

तसेच पुढे आणखी एक ट्विट करत राम कदम म्हणाले की,  “महबूबा मुफ्ती यांनी देखील याचा आगामी निवडणुकीसाठी पुरेपूर उपयोग केला. जी ड्रग्सची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करू शकते त्याविरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र का येऊ शकत नाहीत?. हे दुःख आहे,” अशी खंत राम कदम यांनी व्यक्त केली आहे.

“आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब, नेता, अभिनेता असो…कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले, त्या ड्रग्सविरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्सपासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी एक देशवासी या नात्याने शुभेच्छा,” असंही राम कदम म्हणाले आहेत.

दरम्यान, बॉलीवूडच्या अनेक दिग्ग्ज कलाकारानी त्याला पाठींबा देखील दर्शवला. यानंतर आता आर्यन खानच्या सुटकेसाठी थेट शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या