मुंबई : भाजप नेते राम कदम यांनी नुकतेच पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या यात्रेसाठी घराबाहेर पडताच राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं . राम कदम निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
राम कदम आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतल्यानंतर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याचं राम कदम म्हणाले होते. पालघर हत्याकांडाला 211 दिवस होऊन देखील अजून कारवाई आली नाही. याच्या निषेधार्थ ही यात्रा कदम यांनी काढली होती. शिवाय हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी देखील त्यांनी केली होती.
दरम्यान,आता पालघर प्रकरणावरून आमदार राम कदम पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे चित्र आहे. पालघर प्रकरणाची कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्याच्या निषेधार्थ कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं आहे. राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार आहे.
हिम्मत है #MVA तो इन सवालो का जवाब दे। #palghar तो #जनआक्रोशयात्रा लेकर जाएंगे सारे संत सारे साधू जायेंगे,
ना हम रुकेंगे. ना हम थकेंगे. ना हम झूकेंगे… हम ने भी मन मै ये ठान ली है के जब तक संत समाज को न्याय नही मिलेगा तब तक हमारा संघर्ष जारी रहेगा #PalgharSadhuLynching— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 21, 2020
आम्ही हातात दिवे घेऊन पालघरला जाणार आहोत. याआधी आमची जनयात्रा या सरकारने मध्येच थांबवली होती आणि अटक केली. हे सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या राऊत यांच्या वक्तव्याची चौकशी करा’
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला वारकरी पाईक संघाचा विरोध !
- ‘लव्ह जिहाद’ हा भाजपचा अजेंडा; किशोरी पेडणेकर यांची भाजपवर टीका
- हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळेच ओवेसी अजूनपर्यंत सुरक्षित आहेत – देवेंद्र फडणवीस
- एक दिवस कराचीही अखंड भारतात सामील होणार, देवेंद्र फडणवीसांना विश्वास