Ram Gopal Varma- राम गोपाल वर्माविरोधात अजामीनपात्र वॉरंट

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्या विरोधात औरंगाबाद दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. औरंगाबाद येथे राहणाऱ्या मुस्ताक मोहसिन यांनी वर्मा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून २००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अग्यात’ चित्रपटाची मूळ कथा आपली असल्याचा त्यांनी सांगितले आहे.

 

मुस्ताक मोहसिन यांच्या मते, ‘अग्यात’ चित्रपटाची कथा त्यांनी वर्मा याना पाठवली होती. मात्र कथा पाठवूनही यावर वर्मा यांचे काहीही उत्तर मोहसिन याना मिळाले नाही. पण २००९ मध्ये ‘अग्यात’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट मोहसिन यांच्या कथेवरच असल्याचं त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी यासाठी राम गोपाल वर्मा याना कायदेशीर नोटीस ही बजावली.

 

यांनतर मुस्ताक मोहसिन यांनी वर्मा यांच्या विरोधात याचिका ही दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणी त्यांना समन्स ही बजावले. यांनंतर न्यायालयाने त्यांना नोटीस ही पाठवली. तरी सुद्धा वर्मा यांनी यावर काहीच उत्तर दिले नाही. तब्ब्ल दोन वर्षे मोहसिन हे वर्मा यांच्या उत्तराची वाट पाहत होते. परंतु वर्मा यांनी या प्रकरणाकडे पाठ फिरवल्याने अखेर न्यायालयाने त्यांना अजामीनमात्र वॉरंट जारी केल्याचे मोहसिनने सांगितले.