संभाजी उद्यानातील नाटककार रा. ग. गडकरींचा पुतळा हटवला

पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे.

पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचं संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता.  23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते संभाजी उद्यात राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.

गडकरींच्या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत हा पुतळ हटवण्यात आला असून, तो नदीपात्रात फेकल्याचे बोलले जात आहे. रात्री उशारा ही घटना घडली.

राम गणेश गडकरी हे मोठे नाटककार, उत्कृष्ठ कवी आणि लेखकही होते. त्यांनी काही विनोदी लिखानही केले आहे. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ ही त्यांची नाटके प्रचंड गाजली. ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन त्यांची अपूर्ण राहिलेली नाटके आहेत.