राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी घेतला आत्मदहनाचा निर्णय

ग्रामस्थांनी गावात मोठ्या प्रमाणात आणली लाकडे

राळेगणसिद्धी: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये पुढची रणनिती ठरवण्यात येईल. दरम्यान राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. गावात मोठ्या प्रमाणात लाकडे आणली जात आहेत. अकरा वाजता ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार आहेत.

bagdure

जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन मध्यस्थी करत आहेत, मात्र त्यांच्या शिष्टाईला अद्याप यश आलेलं नाही.

अण्णा हजारे यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पारनेर तालुक्यात गुरुवारी सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. सुपा येथे नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जवळे, पानोली, नगर-कल्याण रोडवर टाकळी-ढोकेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...