fbpx

…म्हणून मी आणि प्रितम मुंडे संसदेत हसलो : रक्षा खडसेंचं स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : बीडच्या खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा संसदेमधील हसण्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यावरून रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

व्हायरल व्हिडीओविषयी स्पष्टीकरण देताना खडसे यांनी संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे सहज हसलो होतो. त्याचा खा. डॉ. भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ त्याचे भांडवल करीत आहेत. खासदार भारतीताई पवार बोलल्या म्हणून आम्ही हसलो असे मुळीच नाही, उलट त्यांना पाठींबा देण्यासाठीच आम्ही थांबलो होतो. असे मत खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना ‘आमच्या हसण्याची विषयाची चर्चा करण्यात आली. आमची मिडीयाला विंनती आहे, कि चांगल्या कामाची प्रसिध्दी करावी, त्या मुंडेच्या कन्या आहेत, आणि मी खडसेंची सून आहे म्हणून त्यांनी हास्य केले असे म्हणणे म्हणण योग्य नाही. डॉ.भारती पवार या खासदार आहेत. त्याही नवीन खासदार आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही रक्षा खडसे म्हणाल्या.