रविकांत तुपकरांसह सहकाऱ्यांना न्यायालयाकडून अंतिम जामीन मंजूर

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘स्वाभिमानी’च्या राज्यभर झालेल्या दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरामध्ये व आजूबाजूला दुधाच्या गाड्यांची व टँकरची तोडफोड झाली होती. या तोडफोडच्या घटनांना जबाबदार पकडत पुणे पोलिसांनी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर,विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे,नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले,सुजित हांडे,अमर पाटील यांच्यावर दि.17 जुलै रोजी विविध कलमा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते दि.20 जुलै रोजी रविकांत तुपकर व सहकार्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.त्यावेळी न्यायालयाने रविकांत तुपकर व सहकार्यांना 31 जुलै पर्यंतचा तात्पुरता जामीन मंजूर केला होता..आज (ता.31जुलै) रोजी रविकांत तुपकर व सहकार्यांना लष्करी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने श्री.तुपकर व सहकार्यांना अंतिम जामीन मंजूर केला..

यावेळी संघटनेच्या वतीने अँड.श्री.कळमकर यांनी न्यायालयीन कामकाज बघितले….
यावेळी गणेशभाऊ जोशी,शर्मिला येवले,दादासाहेब साठे,आकाश दौडकर,निलेश जाधव,साहिल कंट्रोलू,महेंद्र लोखंडे यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते…

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या भाजप सरकारची मस्ती उतरवू – रविकांत तुपकर

राज्यसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक; भाजपकडून नरेश गुजराल याचं नाव आघाडीवर