मुंबई : ‘बिग बॉस’ फेम राखी सावंत नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. यावेळेस राखी सावंत तिच्या नवीन बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून राखी सावंत आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. तिच्या या नवीन रीलेशनशिपमुळे ती सोशल मिडीयावर सतत चर्चेत आहे. आता राखीचा एक व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये राखी आदिलचा हात पकडून १६ वर्षाच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नुकतीच राखी सावंत विमानतळावर दिसली. यादरम्यान तिचा प्रियकर आदिल दुर्रानीही तिच्यासोबत दिसला. या व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणाली आहे की, “दुबईला गेल्यानंतर माझे फॉलोअर्स खूप वाढले आहेत. मला असे वाटते की फॉलोअर्स तरुण बॉयफ्रेंडमुळे वाढले आहेत. आणि जर मला माहित असते की हे असे फॉलोअर्स वाढतात, तर मला १६ वर्षांचा बॉयफ्रेंड असता”.
कोण आहे आदिल?
माहितीनुसार, आदिल हा कार व्यवसायीक आहे. याशिवाय त्याचे अनेक व्यवसाय देखील आहे. आदिल फिटनेसकडे खूप लक्ष देतो. तो नेहमी सोशल वर्कआउटचे फोटो शेअर करत असतो. त्यासोबत वाहनांची आवड असल्यामुळे तो गाड्यांसोबतचे फोटो देखील सोशल मिडीयावर शेअर करत असतो. राखीच्या म्हणण्यानुसार, आदिल हा तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे.
महत्वाच्या बातम्या :