राखी सावंत म्हणते सुशांतसिंग राजपूत माझ्या पोटी जन्म घेणार !

blank

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चित्रपट क्षेत्रातील राजकारण, घराणेशाही, नेपोटिझम पुन्हा एकदा निशाण्यावर आले आहे. सामान्य लोकांसह सिनेअभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यावर आता खुलेपणाने बोलताना दिसत आहे. यामुळे निर्माता करण जोहर, अभिनेता सलमान खान आणि बड्या कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.

पुण्यात कोरोनाचे थैमान, एकाच दिवशी तब्बल एवढे कोरोना रूग्ण !

अशात आता वादग्रस्त विधानं करण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंत हिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुशांतच्या बाबतीत राखी असं काही बोलून गेली आहे, की तिच्या या वक्तव्यानं अनेकांनाच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात राखीचं वक्तव्य सोशल मीडियावर फक्त चर्चां रंगवणार इतकच आहे, हेसुद्धा तितकंच खरं.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत राखीनं चक्क सुशांत आपल्या पोटी पुन्हा जन्म घेणार असल्याचं सांगितलं. मी रात्री झोपले होते, तेव्हाच अचानक आवाज झाला. कोण आहे असं विचारल्यास आवाज आला, मी सुशांत सिंह राजपूत, असं म्हणत राखीनं हा व्हिडिओ पोस्ट केला.

धनंजय मुंडेंनी कोरोनाला हरवलं, आज रुग्णालयातून घरी परतणार

सुशांतनं स्वप्नात येत आपल्याला या कलाविश्वानं फार त्रास दिल्याचं म्हणज वेगळं काढल्याचंही तो म्हणाला, असं राखीनं सांगितलं. ‘मी या साऱ्यांचाच सूड घेईन. शरीर अस्तित्वात नसलं तरीही माझा आत्मा अद्यापही अस्तित्वात आहे. त्यामुळं मी कोणालाही सोडणार नाही’, असं सुशांतनं स्वप्नात सांगल्याचं राखी या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसते.