मला जगावंसं वाटत नाही: राखी सावंत

rakhi - shridevi

टीम महाराष्ट्र देशा- प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे.अनेक कलाकारांप्रमाणे आयटम गर्ल राखी सावंतनंही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राखीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली ज्यात तिने श्रीदेवीच्या निधनानंतर मला जिवंत राहावसं वाटत नाहीए. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.”, अशा भावना व्यक्त केली आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही नेटीझन्सनी ‘तू ओव्हर अॅक्टिंग करू नको’ असं म्हणत राखीला ट्रोल देखील केलं आहे.

नेमकं काय म्हणाली राखी सावंत ?

“श्रीदेवी मॅम, तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुमच्या निधनानं आम्हाला प्रचंड दु:ख झालं आहे. तुमच्यासारखं कोणचं नाहीए. तुमच्यासारखं कोणीही डान्स करू शकत नाही किंवा अभिनयही करू शकत नाही. आता तर मला जिवंत राहावसं वाटत नाहीए. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.”, अशा भावना राखीनं या व्हिडिओत व्यक्त केल्या आहेत.