कलम ३७० माझ्यामुळे रद्द झाले, राखी सावंतचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू काश्मीरविषयीचे बहुचर्चित कलम ३७० रद्द केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीरला मिळणारे विशेषाधिकार आता संपले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाच सगळीकडून अभिनंदन करण्यात येत आहे. अशातच अभिनेत्री राखी सावंत हिने मोठा दावा केला आहे.

राखी सावंतने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन करताना मोदीजी धन्यवाद, काश्मीर आपलं झालं आहे. मला तुमचा अभिमान आहे. तुमच्यासारखं कोणी नाही. कलम ३७०वर आधारित चित्रपटात मला भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक, निर्मात्यांचे आभार. काश्मीर व कुलूमध्ये चित्रपटाचं पूर्ण चित्रीकरण झालं आहे अस तिने म्हटले आहे.

तसेच पुढे तिने ‘सर्वात आधी आम्ही या मुद्द्याला हात घातला. माझं ऐकून तुम्ही ३७० रद्द केलं यासाठी मोदीजी धन्यवाद, माझं ऐकल्याबद्दल तुमचे आभार’ अशा शब्दात नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. राखीच्या या दाव्यामुळे ती सोशल मिडीयावर चांगलीच ट्रोल होण्याची शक्यता आहे .

दरम्यान, राखी सावंत ही तिच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. या आधीही तिने अशाच प्रकारची वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केले आहेत. परंतु तिच्या अशा या विधानांना चाहते फारसे गंभीरपणे घेत नाहीत. राखी सावंत ही सध्या विविध सोशल मिडिया वर झळकताना दिसत असते. अशातच सध्या जगभरात विशेष असणाऱ्या कलम ३७० वर भाष्य केल्याने आता तिला काय प्रतिक्रिया मिळतात हे काही हौशी मंडळी व तिच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याच असणार आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात येत्या 48 तासात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

 

कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकारशी बोलणार,मोदींचे पवारांना आश्वासन

 

पूरग्रस्तांना मिळणारा निधी थेट बँकेत; राज्य सरकारचा निर्णय