महाराष्ट्र देशा डेस्क : ड्रामाक्वीन राखी सावंत हिचा प्रियकर आदिल दुर्राणी याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. राखी आणि आदिलने मीडियाला सांगितले की बिश्नोई गँगच्या सदस्यांनी त्याला राखीला सोडण्यास सांगितले आहे. त्याच्या फोनवर एक मेसेज आला आहे, ज्यामध्ये त्याला सांगण्यात आले आहे की, जर आदिलने राखीला सोडले नाही तर ते त्याला जीवे मारतील. धमकी मिळाल्यानंतर राखी आणि आदिलने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीडियाशी बोलताना राखीने सांगितले की, आदिलने तिचा जीव वाचवला आहे आणि त्यामुळे तिचे त्याच्यावर खूप प्रेम आहे. राखी पुढे म्हणाली की, “प्रेम करणे गुन्हा आहे का. मी हिंदू आहे आणि तो मुस्लिम आहे तर काय झाले? आम्ही धर्म मानत नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, आम्ही काय चूक केली आहे का? आम्ही कोणाचं काही वाईट केलेलं नाही. त्यामुळे धमक्या देणे थांबवा, आदिल माझा जीव आहे. त्याला काही करण्याआधी मला मारा.”
या व्हिडिओत आदिलने मीडियाला धमकीचे मेसेज देखील दाखवले, ज्यामध्ये राखीला सोड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू, असे लिहिले होते. आदिलने धमकी देणाऱ्या लोकांना विचारले, “तुम्ही मला का मारणार आहात, मी काय चूक केली आहे? प्रेम करणे चुकीचे आहे का? मला एक स्त्री आवडते, मला तिच्यासोबत राहायचे आहे. प्रेम करणं हा गुन्हा आहे का?”
राखी आणि आदिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता व्हिडिओत त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या खऱ्या आहेत कि नेहमीप्रमाणे राखी प्रकाश झोतात राहण्यासाठी हे करत आहे, हे तर ठाऊक नाही. पण गेल्या काही दिवसांपासून अनेक स्टार्सना अशा धमक्या येत आहे. गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानसह अनेक स्टार्सना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनाही अलीकडेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याशिवाय नुकतेच पंजाबी गायक जानी यालाही धमक्या येत आहेत. त्यासाठी त्याने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडे संरक्षण देखील मागितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sunil Raut । संजय राऊतांच्या भोंग्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रिपद मिळालं – सुनील राऊत
- Sharad Pawar | संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवार गप्प का? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- Ajit pawar | “नुकसानग्रस्त भागात तातडीने मदत द्या”; अजित पवारांची सातत्याने मागणी
- Ajit Pawar । मंत्रिमंडळ विस्तार करायला सरकार कशाला घाबरत आहे?; अजित पवार आक्रमक
- Sudhir Mungantiwar | काही लोक राजकीय पक्ष आपल्या परिवाराच्या मालकीचा समजतात – सुधीर मुनगंटीवार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<