दैव बलवत्तर ! नक्षल्यांच्या ताब्यातील जवानाची अखेर सुटका

rakeshwar singh manhas

छत्तीसगड : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बीजापुर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत 22 जवान शहीद झाले. आणि 31 अन्य जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर, सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह मन्हास हे बेपत्ता होते.

दरम्यान, ते नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची माहिती यानंतर समोर आली होती. तसेच, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा ते जीवानिशी जातील अशी धमकी देखील नक्षलवाद्यांनी दिली होती. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव हा टांगणीला लागला होता. तर, जोपर्यंत ते सुखरूप घरी पोहोचत नाही तोपर्यंत त्यांच्या पत्नीने उपोषण करण्याचे ठरवले होते.

अखेर, ३ एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर आज या जवानाची सुटका करण्यात आल्याचं दिलासादायक वृत्त समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी अपहृत केलेल्या सीआरपीएफ मधील कोब्रा युनिटचे राकेश्वर सिंह मन्हास यांची सुटका केल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. या वृत्ताला या जवानाच्या पतीनीने देखील दुजोरा दिला असून त्यांची तब्येत देखील चांगली असल्याचे सांगितले आहे. यामुळे देशाच्या एका वीरपुत्राचे प्राण वाचल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह देशवासीयांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :