येत्या १५ जूनला ओबीसी मोर्चा निघणारच, आक्रमक प्रकाश शेंडगेंनी सरकारची डोकेदुखी वाढवली

prakash shendange uddhav thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींकडे मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणासह ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा केली. त्यानंतर लगेचच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या 15 जून रोजी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेट घेत असतनाच खासदार संभाजी छत्रपती यांनी येत्या 16 जून रोजी मराठा मोर्चाची हाक दिलेली आहे. त्यांनतर आता शेंडगे यांनी ओबीसी मोर्चा निघणार असल्याचे सांगितल्याने महाविकास आघाडी सरकारच्या डोकेदुखीत भर पडली आहे.

एक डेडिटकेटेड आयोग नेमून ओबीसींचा डाटा गोळा करावा. त्यानंतर हा डाटा सुप्रीम कोर्टाला सादर करावा. तरच ओबीसींचे आरक्षण टिकेल. सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही तर येत्या 15 तारखेला ओबीसी समाज रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करेल. याची जबाबदारी सरकारचीच असेल, असा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP