राज्यसभेच्या 58 जागांसाठी आज मतदान

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेच्या 58 जागांसाठी आज 16 राज्यांमध्ये मतदान होणार आहे.तसंच एक लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

राज्यसभेचं संख्याबळ कायम 250 असते . यातले 233 सदस्य हे निवडून आलेले असतात तर उरलेले सर्व खासदार नामांकित असतात. राज्यसभेत प्रत्येक राज्याला ठराविक जागा दिलेल्या असतात. या जागा त्या त्या राज्याच्या संख्याबळानुसार ठरतात. राज्यसभेसाठी सामान्य माणसं मतदान करत नाहीत तर विधानसभेचे आमदार मतदान करतात. राज्यसभेत निवड होण्यासाठी मतसंख्या ठरलेली असते.

या फेरीत उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ,राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश बिहार,गुजरात, हरियाणा, तेलंगण या राज्यांचा समावेश आहे. सध्या राज्यसभेत कुठल्याच पक्षाला बहुमत नाही.

You might also like
Comments
Loading...