सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी

महाराष्ट्रातून आतापर्यंत फक्त चार नावं जाहीर

नवी दिल्ली: राज्यसभेसाठी भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सरोज पांडे यांना छत्तीसगडमधून उमेदवारी मिळाली असून थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

राज्यसभेच्या खासदारकीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या (सोमवारी) संपणार आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेसची यादी आज रविवारीच जाहीर होईल. महाराष्ट्रातून सहापैकी चार नावं जाहीर झाली आहेत. भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. छत्तीसगडमधून सरोज पांडे यांना उमेदवारी मिळाली आहे. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

भाजपने एकूण नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये सर्व केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून भाजपकडून प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे अशी दोन नावं जाहीर झाली आहेत. नारायण राणे सोमवारीच अर्ज दाखल करणार आहेत. तसेच तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून एकनाथ खडसेंचं नाव जरी चर्चेत असलं. तरी खडसे अनुत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.

महाराष्ट्रातून आतापर्यंत शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर भाजपकडून जावडेकर आणि नारायण राणे अशी चार नावं जाहीर झाली आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसची एकमेव जागा कुणाला मिळणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

You might also like
Comments
Loading...