fbpx

उद्यापर्यंत निर्णय घ्या, अन्यथा 15 जागांवर उमेदवार जाहीर करू – राजू शेट्टी

पुणे : काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत जाण्याची आमची तयारी आहे. यासाठी आम्ही 3 जागांची मागणी केली असून उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वाभिमानी आपल्या 15 उमेदवारांची यादी जाहीर करेल, असा इशारा खा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

काँग्रेस आघाडीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. मात्र आघाडीकडून केवळ हातकणंगलेची जागा सोडण्यास सहमती दर्शवली जात आहे. तर स्वाभिमानीकडून 3 जागा न मिळाल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राजू शेट्टी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

काँग्रेस राष्ट्रवादीला काल दोन दिवसांची मुदत दिलेली आहे

आघाडीमध्ये आम्ही तीन जागांची मागणी केलेली आहे, हातकणंगले, वर्धा, बुलढाणासाठी आमची मागणी

उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास आमच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करून

जानकर हे मित्र आहेत, त्यामुळे भेटीगाठी सुरू असतात.

माढा दिल्यास लढण्याची तयारी

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी सर्वाना अंगावर घेतले आहे, त्यामुळे मला कोणी बिनविरोध निवडून देणार नाही. त्यामुळे माझ्या विरोधात कोणीतरी उभारणार हे नक्की आहे. फक्त 21 वर्ष पूर्ण नसलेल्या आणि वेड्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येत नाही..

वेड्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येत नाही, राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांना टोला

1 Comment

Click here to post a comment