fbpx

पवारांची डोकेदुखी वाढणार,स्वाभिमानीची माढ्याच्या लढाईत एन्ट्री

टीम महाराष्ट्र देशा- स्वबळाचा नारा दिलेल्या स्वभिमानीने आता माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.एल्गार मेळाव्यात खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले व माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत.

स्वाभिमानीची स्वबळावर 9 मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी वेळापूर इथल्या मेळाव्यात केली आहे.शरद पवार यांनी आपण माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच घोषीत केलं.भाजपकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही या पार्श्वभूमीवर स्वभिमानीने घेतलेला हा मोठा निर्णय आघाडी तसेच पवारांची डोकेदुखी वाढवणारा आहे.

दरम्यान, सोशल मिडीयावर माढा आणि शरद पवारांना पाडा असा ट्रेंड सुरु आहे.स्वभिमानीने आपली तलवार म्यान केली नाही तर शरद पवार यांना भाजपबरोबरच स्वाभिमानीच्या आव्हानाचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे.माढ्यातील लढाई सोपी नसल्याने पवार आपल्या उमेदवारीचा पुनर्विचार करू शकतात अशी देखील चर्चा सुरु झाली आहे.