मनसे आणि वंचित हे असतील तरच महाआघाडीमध्ये येणार : राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीबद्दल मोठं विधान केले आहे. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा समावेश असेल तरच महाआघाडीमध्ये येणार असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून सध्या मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून लढणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत होते. विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी ‘लोकशाही टिकवण्यसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचे आहे. ‘त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये मनसे आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र असल्यास ते महाआघाडीचा भाग असतील अस विधान केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर शेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे मनसे आणि स्वाभिमानीसह वंचितही महाघाडीत सामील होऊ शकते.