शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषिखातं स्वीकारण्यास तयार : राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कृषीखातं सांभाळण्याची तयारी दाखवली आहे. सरकारकडून जर तसा प्रस्ताव आला तर नक्की त्याचा स्वीकार करेल आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावेल, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी राज्याचे नवे कृषीमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चांवर राजू शेट्टी यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली. समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषीमंत्री स्वीकारू आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू,’ असे राजू शेट्टी म्हणाले.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन मुख्य पक्षांच्या सरकारमध्ये राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील सामील आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांच्याही नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. दरम्यान राजू शेट्टी यांची ओळख ही आक्रमक शेतकरी नेता अशी आहे. अनेकदा राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे पारश घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. तर लोकसभेतही त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले आहेत. त्यामुळे राज्याच्या कृषीखात्याची जबाबदारी ही राजू शेट्टी यांच्यावर सोपवण्यात येणार आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...