मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी आंबेडकरांना मिळणार ‘स्वाभिमानी’ची साथ

स्वाभिमानी – भारिप युती मुळे इतर राजकीय पक्षांचे धाबे दणाणले

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर या दोहोंमध्ये येत्या ६ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे होणार असलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

bagdure

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर आणि भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी अकोला येथे बैठक पार पडली. पुढील वाटाघाटासाठी खासदार राजू शेट्टी आणि  आंबेडकर यांच्यात मुंबई येथे ६ आॅक्टोबजर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत युतीचे भवितव्य ठरणार असल्याचे  तूपकर यांनी सांंगितले.

You might also like
Comments
Loading...