‘चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री’

टीम महाराष्ट्र देशा – चंद्रकांत पाटील राज्यातील दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहे. भाजपकडे शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत. असा आरोप राजू शेट्टी यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टीनी कारखानदारांसोबात सेटलमेन्ट करून स्वतःच घर भरल्याचा आरोप केला होता त्यावर पलटवार करत राजू शेट्टी यांनी हा आरोप सिद्ध करून दाखवा अस आव्हान पाटलांना केलं. तसेच तुमच्याकडे ईडी, आयकर विभाग, सीआयडी, सीबीआय, पोलीस आहेत त्यांच्यामार्फत चौकशी करा आणि आमच्यावर कारवाई करा असं आव्हानही राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना दिलं. तसेच त्यांनी चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री असल्याचा आरोप पाटलांवर केला.

नक्की काय म्हणाले राजू शेट्टी ?

चंद्रकांत पाटील राज्यातील दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहे. भाजपकडे शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची माहिती आहे, अभियंत्यांकडून किती घेतले, ठेकेदारांकडून किती घेतले, मातीत किती घेतले ही सगळी माहिती घेऊन पुरावे घेऊन मी बिंदू चौकात येतो. तुम्हीही तुमच्याकडील माहिती घेऊन या, असं राजू शेट्टी म्हणाले.

सार्वजनिक क्षेत्रांमध्ये माणसाचे आयुष्य हे उघड्या पुस्तकाप्रमाणे असलं पाहिजे आणि ते जनतेला कळालं पाहिजे. जो माणूस लोकांकडून पाच-दहा हजार उसने मागत होता, तो माणूस आता घरी गेलं की किती पैसे पाहिजेत असं विचारतो. एवढे पैसे कुठून आणले कळणे गरजेचं आहे, असं राजू शेट्टी चंद्रकांत पाटलांना उद्देशून म्हणाले.