राजू शेट्टी यांनी घेतली शरद यादव यांची भेट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर चर्चा झाली. मोदी सरकारनं शिफारसी लागू न केल्यास राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेट्टींनी यादवांना सांगितलं.
आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं शरद यादव यांनी जाहीर केलं आहे. तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार पाहून मतदान करणार असल्याचंही खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.नुकतेच महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि इतर राज्यात शेतकऱ्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारल्याच पहायला मिळालं होतं या पार्श्वभूमीवर शेट्टी-यादव यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.ही भेट नवी। राजकीय समिकरणांची नांदी ठरतेय का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे