दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी

Raju Shetty news

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाच्या धर्तीवर दूध बंद आंदोलनाची धास्ती घेऊन जवळपास सर्वच खासगी संघांनी दूध घेण्यास सुट्टी दिली आहे. दरम्यान, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांनी रविवारी मध्यरात्री विठ्ठल -रुक्मिणीचे दर्शन घेऊन नामदेव पायरीपासून दूध बंद आंदोलनाला प्रारंभ केला यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, संघटनेच्या मागणीवर सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने राज्यभरात ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या अडवण्यात आल्या असू काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले आहे.

पुण्यामध्ये देखील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. यावेळी खा राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवा मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, खा राजू शेट्टींचा पंढरपुरमध्ये विठ्ठलाला तर पुण्यात दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक

शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- खासदार राजू शेट्टी

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...