fbpx

उत्तर प्रदेशची पुनरावृत्ती महाराष्ट्रात, राजू शेट्टी महाआघाडीतून बाहेर ?

टीम महाराष्ट्र देशा: उत्तर प्रदेशमध्ये सपा – बसपामुळे महाआघाडीला धक्का बसला असताना आता महाराष्ट्रातील देखील आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. भाजपची साथ सोडून आघाडीत सहभागी होण्यासाठी उत्सुक असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ९ जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी कॉंग्रेस – राष्ट्रवादीकडे राज्यातील ४८ पैकी ९ जागांची मागणी केली आहे. परंतु दोन्ही पक्ष शेट्टी यांना केवळ हातकणंगले ची जागा सोडण्यास तयार आहेत. त्यामुळे शेट्टी यांनी स्वतंत्रपणे लोकसभेच्या ९ जागा लढवण्याची तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ताकद असणाऱ्या हातकणंगले, कोल्हापूर, माढा, बुलढाणा, वर्धा, शिर्डी, सांगली, परभणी, औरंगाबाद लोकसभा जागेची मागणी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे लढण्याची शक्यता असणाऱ्या माढा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. तर बुलढाणा लोकसभेची जागा ही रविकांत तुपकर यांच्यासाठी मागण्यात येत आहे.

4 Comments

Click here to post a comment