जोतिष्यांना भविष्य समजत नाही परंतु चंद्रकांतदादांना अचूक भविष्य समजते

सांगली – ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या विरोधकांना न्यायालयाने सणसणीत चपराक लगावून देखील जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून सुरूच आहे. असे असून देखील स्वभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा यांनी पुन्हा एकदा सांगलीत बोलताना ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे .

देशातील सर्व विरोधक ईव्हीएम विरोधात आंदोलन करत आहेत. तसेच लवकरच ईव्हीएम मशीन हटावसाठी देशात जनआंदोलन उभे राहील, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. अनेक भविष्यवेते, ज्योतिषांचे निवडणूक निकालाचे अंदाज आणि भाकीत चुकली. मात्र, भाजप नेत्यांचे भाकीत अचूक ठरले. त्यामुळे जोतिष्यांना भविष्य समजत नाही. परंतु भाजप नेते आणि खासकरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना अचूक भविष्य समजते, असा टोला लगावत राजू शेट्टी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.