fbpx

‘लोकांनी मते मलाच दिली होती मात्र, ती माझ्यापर्यंत आली नाहीत’

औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीत लोकांनी मते मलाच दिली होती मात्र, ती माझ्यापर्यंत आली नाहीत, असे म्हणत आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असून दिलेली मते दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. त्यांनी मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा केला.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.दरम्यान, राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर देखील टीका केली. सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतांना आम्ही सर्व मडक्यांना सारखाच आकार दिला होता. पण सदाभाऊ खोत यांच मडकं कच्चं निघालं. यापुढे मडकी पारखून घेणार, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.