अन्यथा १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार – राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत न घेतल्यास १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल व त्यातून जी परिस्थिती उदभवेल त्यास सरकार जबाबदार असेल असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

तर प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला दगड येतील – राजू शेट्टी

‘फुकट दूध प्या, आमचा तळतळाट घ्या’; आता शेतकरी वाटणार मंत्रालयाच्या दारावर दूध