Raju Shetti- राजू शेट्टी यांना अटक

माध्यप्रदेश –  पिंपलियामंडी जिल्हा मंदसौर (मध्यप्रदेश) येथे किसान मुक्ती याञा चिरडण्याचा मध्यप्रदेश सरकारचा केविलवाणा प्रयत्न केला आहे .

     सकाळी 9:30 वा.किसान मुक्ती याञेला बुढगाव येथुन पदयात्रेला सुरूवात झाली होती ही याञा बुढगाव येथून पिंपलीया मंडीच्या दिशेने निघाली होती. पिंपलीया मंडी येथे गोळीबारात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहुन छोट्या खानी सभा करून ही याञा रिचालाल मुआकडे प्रयाण करणार होती.परंतु मध्यप्रदेश पोलीसांनी पिंपलीया मंडी येथून 6 किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेश पोलिसांनी अडविले व खा.राजु शेट्टी , रविकांत तुपकर , व्हि.एम.सिंग, योगेंद्र यादव, मेघा पाटकर यांना पिंपलिया मंडी येथून अटक करण्यात आली आहे .