…तर गाठ आमच्याशी आहे ; राजू शेट्टींचा दूध संघांना इशारा

टीम महाराष्ट्र देशा : गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत, त्यामुळे संघांनी शेतकऱ्यांचा भानगडीत पडू नये. गायी घ्यायला पैसे दिले म्हणून दूध संघांकडून उत्पादकांवर संकलनाची सक्ती कराल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दूध संघांना दिला आहे. दूध दरासाठीची आमची ही लढाई आरपारची आहे, तुम्ही दर वाढवून द्या नाही तर आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहनही त्यांनी संघांना केले.

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी बोलत होते.

शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस प्रारंभ

भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे – राजू शेट्टी

1 Comment

Click here to post a comment