‘राजू शेट्टींचा विजय म्हणजेच देशातील सगळ्या शेतकऱ्यांचा विजय’

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून विजय मिळवल्यास तो देशातील सगळ्या शेतकऱ्यांचा विजय असेल असं मत स्वराज अभियान संघटनेचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

राजू शेट्टी यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला. त्यांच्या प्रचारासाठी योगेंद्र यादव कोल्हापूरात आले होते. शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी विधेयके मांडली आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले शेट्टींनी सेना-भाजपच्या युतीतून बाहेर पडले हा खूप मोठा निर्णय होता. शेट्टी जर लोकसभेवर निवडून गेले तर तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय नसेल तर तो देशातील प्रत्येक शेतकऱ्यांचा विजय असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे