आमची आघाडी जनतेला पसंत पडली नाही; राजू शेट्टींंची खंत

टीम महाराष्ट्र देशा- राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढत असून त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना संधी दिली आहे. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही टप्प्यात दोघेही पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सेनेचे धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांना चांगली लढत दिली असून सांगलीत विशाल पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मतमोजणीची सुरुवातीचे कल पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस – राष्ट्रवादी यांची आघाडी जनतेला पसंत पडलेली नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

Loading...

दरम्यान,लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आज देशातील जनतेने कोणाला पुढील पाच वर्ष सत्ता दिली आहे हे स्पष्ट होणार आहे. पहिल्या फेरीचे कल जाहीर झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ४७ जागांचे कल जाहीर झाले आहेत. त्यापैकी तब्बल ३८ जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत