हातकणंगले लोकसभा मतदार संघात होणार लक्ष्यवेधी लढत,राजू शेट्टीसमोर असणार सदाभाऊंचे आव्हान

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणूकीत हातकणंगले मतदारसंघावर सर्वांचे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे कारण या मतदारसंघात एकेकाळी सख्खे मित्र असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानीला सोडचिट्टी दिलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात लढत होणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे.

हातकणंगले मतदारसंघाचा १९६२ इतिहास पाहिला तर हातकणंगले मतदारसंघाच्या अगोदर येथे इचलकरंजी मतदार संघ होता २००९ मध्ये हातकणंगले मतदारसंघ अस्तित्वात आला.या लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा जास्त बोलबाला राहिलेला आहे.आगामी लोकसभा निवडणूकीला जरी आठ ते दहा महिने अवधी असला तरी सध्या या मतदारसंघात मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे. ही निवडणूक राजू शेट्टी विरूध्द सदाभाऊ खोत होणार हे जवळजवळ निश्चित आहे.

हातकणंगले मतदारसंघ अस्तित्वात येण्या अगोदर हा मतदारसंघ इचलकरंजी मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. १९७७, १९८०,१९८४,१९८९, १९९१ असे सलग पाच टर्म हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात होता कॉंग्रेसचे राजाराम माने हे सलग पाच वेळा निवडून आलेले होते.त्यांनतर १९९६ आणि १९९८ साली कॉंग्रेसचे कलप्पा आवाडे यांनी दोन वेळा ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवेदिता माने खासदार झाल्या.

२००९ साली इचलकरंजी मतदारसंघाचे पुनर्रचना होऊन हातकणंगले मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ साली स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यावेळचे खासदार निवेदिता माने यांचा पराभव करून दिल्ली गाठली.मात्र यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव करून राजू शेट्टी दुसऱ्यांदा खासदार झाले.

पण सध्याची परिस्थिती बघितली तर राजू शेट्टींना रोखण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे.दररोज या मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या,मतदारांच्या आणि नेत्यांच्या भेटी घेण्यावर ते भर देत आहेत. विविध विकासकामांची उद्घाटने केली जात आहेत. विकासकामांच्या मुद्द्यावरच आगामी निवडणूक लढविण्याचा खोत यांचा मानस आहे.

…तर गाठ आमच्याशी आहे ; राजू शेट्टींचा दूध संघांना इशारा

पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे-खोत