भविष्यात राम शिंदे राज्याचं नेतृत्व करतील, राजू शेट्टींची भविष्यवाणी

Ram-Shinde-

जामखेड – शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या बाबतीत एक मोठे विधान केले आहे. राम शिंदे हे आज विधानसभेत नसले तरी ते भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करतील’ अशी भविष्यवाणी शेट्टी यांनी केली आहे.

राज्याचं लक्ष लागलेल्या लढतींपैकी एक लढत होती ती कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादीचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यातील. पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रोहित पवार यांनी विद्यमान मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता.

प्रभातने दिलेल्या वृत्तानुसार,’माजी जलसंधारण व नगर जिल्हाचे पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघात चांगले काम केले तरी त्यांना पराभव स्विकारावा लागला. दुर्दैवाने ते राज्याच्या विधानसभेत नाही. भविष्यात ते राज्याचे नेतृत्व करतील’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना केले.